Bigg Boss 20 Grand Premiere LIVE : आज ‘बिग बॉस 20’चा धमाका, जाणून कधी कुठे आणि केव्हा पाहू शकणार बिग बॉस 20..
Bigg Boss 20 Grand Premiere LIVE Coverage and Updates : बिग बॉसचा धमाका आजपासून सुरू होणार आहे. सलमान खानचा पुन्हा एकदा धमाकेदार लूक बघायला मिळेल. आजपासून रात्री 9 वाजल्यापासून बिग बॉस सीजन 20 ला सुरूवात होईल.

LIVE NEWS & UPDATES
-
कधी आणि कुठे पाहू शकणार बिग बॉस 20
6 सप्टेंबर 2026 ला बिग बॉसच्या प्रीमियरला सुरूवात होईल. सलमान खान बिग बॉसला होस्ट करेल. कलर्स टीव्ही आणि जिओ-हॉटस्टारवर आपण बिग बॉस पाहू शकता.
बिग बॉस सीजन 20 ला सुरूवात होईल. सलमान खान हा बिग बॉस 20 (Bigg Boss 20) ची धमाकेदार सुरूवात करेल. रात्री 9 वाजता बिग बॉस सीजन 20 च्या ग्रॅंड प्रीमियरला सुरूवात होईल. बिग बॉस 20 च्या या सीजनमध्ये नक्की कोण कोण सहभागी होणार याकरिता लोकांमध्ये उत्सुकता बघायला मिळतंय. श्वेता तिवारी बिग बॉसच्या घरात दाखल होणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच मुंबईमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले, त्यावेळी मुंबई पोलिसांच्या गाडीला अडवणारी रिया आहिर देखील बिग बॉसमध्ये सहभागी होणार आहे. यंदाचे सीजन हीट ठरावे, याकरिता मोठा प्रयत्न निर्मात्यांकडून केला जात आहे. बिग बॉस सीजन 20 हीट करण्यासाठी निर्मात्यांनीही कंबर कसली आहे.
Published On - Sep 06,2026 7:04 PM
