संरक्षक भिंत हा उपाय नाही, पुराचं पाणी दुष्काळी भागात वळवलं पाहिजे : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jul 27, 2021 | 6:59 PM

संरक्षक भिंत बांधणं हा काय उपाय नाही. पुराचं पाणी कॅनल तयार करुन दुष्काळी भागात न्यावं. दीर्घकालीन उपाय तोच असू शकतो, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Follow us on

पुरस्थिती लक्षात घेता ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे त्यासंदर्भात राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. संरक्षक भिंत बांधणं हा काय उपाय नाही. पुराचं पाणी कॅनल तयार करुन दुष्काळी भागात न्यावं. दीर्घकालीन उपाय तोच असू शकतो, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा दौरा हा राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपालांकडे फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी चार प्रमुख पक्षांच्या एका आमदार किंवा खासदाराला बोलावलं होतं. मात्र, सत्ताधारी पक्षातील नेते राज्यपालांसोबत आले नाहीत. ते का आले नाहीत मला माहिती नाही. मात्र, आमचे आशिष शेलार राज्यपालांसोबत गेले हे योग्य आहे, असंही फडणवीसांनी आवर्जून सांगितलं.