Devendra Fadnavis | शिवसेनेत अंतर्गत खदखद निश्चित आहे, कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर फडणवीसांचं विधान

Devendra Fadnavis | शिवसेनेत अंतर्गत खदखद निश्चित आहे, कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर फडणवीसांचं विधान

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 11:47 AM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. आज ते नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. आज ते नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया व्यक्त केली. व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप खरी की खोटी यावर मी काही कमेंट करणार नाही. मात्र शिवसेना अंतर्गत मोठी खदखद निश्चित आहे. मी काही त्यांच्या पक्षाचा नेता नाही. त्यामुळे त्या संदर्भात जी काही कारवाई करायची आहे, ते त्यांचा पक्षाचा नेता करेल, असं सांगतानाच शिवसेनेती अनेक नेत्यांशी पदाधिकाऱ्यांनी अनेक वर्षांपासून संबंध आहेत. तिथले अनेक लोक मला भेटत असतात. त्यांच्या मनातलं काय ते सांगत असतात. त्यामुळे शिवसेनेत मोठी खदखद आहे, एवढं मात्र निश्चित, असं फडणवीस म्हणाले.