Ashadhi Wari 2025 : रेशमी बाराबंदी अन् भरजरी मोराची पैठणी; आषाढी एकादशीसाठी विठ्ठल-रखुमाईचा खास पोशाख
Viththal - Rukhmini Clothes : आषाढी एकादशीसाठी यंदा विठ्ठल-रखुमाईला खास वस्त्र तयार करण्यात आले आहेत.
यंदाच्या आषाढी एकादशीसाठी विठ्ठल-रखुमाईला खास वस्त्र तयार करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेच्या अनुषंगाने तुषार भोसले यांनी हे खास वस्त्र तयार केले आहेत. रुख्मिणीसाठी खास पैठणी साडी तयार करण्यात आली आहे. हे खास महावस्त्र आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-राखुमाईला घातले जाणार आहेत. अत्यंत सुंदर आणि आकर्षक असे हे वस्त्र भोसले यांनी तयार केलेले आहेत.
यावेळी बोलताना तुषार भोसले म्हणाले की, 6 जुलै रोजी आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून सपत्नीक राज्याच्या 12 कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून पूजा करणार आहेत. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातली ही पहिली महापूजा असणार आहे. म्हणून त्यांच्यावतीने पांडुरंग आणि रुख्मिणी मातेसाठी हा खास पोशाख बनवून घेतला आहे. हा पोशाख पूर्णपणे रेशमी वस्त्राचा वापर करून हा पोशाख बनवण्यात आला आहे.
