CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नुकताच पितृशोक झाला असून राज्यातील प्रमुख नेत्यांनी आज त्यांच्या पुण्यातील कोथरूड येथील निवासस्थानी भेट देत सांत्वन केले.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नुकताच पितृशोक झाला असून राज्यातील प्रमुख नेत्यांनी आज त्यांच्या पुण्यातील कोथरूड येथील निवासस्थानी भेट देत सांत्वन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोहोळ कुटुंबीयांची भेट घेत दिवंगत किसनराव मोहोळ यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत धीर दिला. तसेच दिवंगत किसनराव मोहोळ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही मोहोळ कुटुंबीयांचे सांत्वन करत दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. मोहोळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेकांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
Published on: Jun 26, 2026 4:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
