चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश

चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश

| Updated on: Sep 24, 2026 | 12:30 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा ऐकल्या. सरकारच्या वतीने तातडीने मदत करण्याचे आणि लवकरच दुष्काळ जाहीर करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. शेतकरी मात्र तात्काळ मदतीची मागणी करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पश्चिम विदर्भात, विशेषतः वाशिममध्ये गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कामरगावातील मसला येथील शेतात मुख्यमंत्री स्वतः पोहोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि आर्थिक संकटाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

चार एकर सोयाबीनसाठी एक लाख रुपये खर्च करूनही उत्पादन खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले. एका महिला शेतकऱ्याने तर मुख्यमंत्र्यांच्या पाया पडत मदतीची याचना केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना धीर देत सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांनी मात्र तात्काळ आणि पुरेशी मदत मिळावी अशी मागणी केली आहे. सरकारकडून योग्य उपाययोजना केल्या जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले, मात्र विरोधकांच्या राजकारणावरही त्यांनी टीका केली.

Published on: Sep 24, 2026 12:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us