शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ

शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ

| Updated on: Aug 19, 2026 | 5:39 PM

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक सिब्बल यांनी अधोरेखित केला. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सिब्बल यांच्या मागणीचे समर्थन करत, धनुष्यबाण चिन्ह एकतर आम्हाला द्यावे अन्यथा ते गोठवावे अशी भूमिका मांडली.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सुनावण्या सुरू आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवादादरम्यान विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील महत्त्वाचा फरक न्यायालयासमोर मांडला. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांचा आहे आणि हे चिन्ह शिंदेंना वापरता येऊ नये. त्यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली. याच मागणीचे समर्थन करत अरविंद सावंत यांनी म्हटले की, जर धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळत नसेल, तर ते शिंदे गटालाही मिळू नये आणि गोठवले जावे.

सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेच्या कारवाईबाबतही युक्तिवाद झाला, ज्यात देवदत्त कामत यांनी आमदारांना अपात्र करता येऊ शकते असे मत मांडले. सावंत यांनी काँग्रेस पक्षाच्या विभाजनाचे उदाहरण देत, मूळ चिन्ह कुठल्याही गटाला न मिळाल्याचा संदर्भ दिला. राजकीय पक्ष कायम असतो, तर विधिमंडळ पक्षाचा कार्यकाळ मर्यादित असतो, हा मुद्दाही न्यायालयात मांडला गेला.

Published on: Aug 19, 2026 5:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us