Special Report | Kirit Somaiya यांनी टार्गेट बदललं? Sanjay Raut यांनी मुद्दा बदलला?-TV9
संजय राऊतांना वाईन व्यावसायात भागिदारी कशी मिळाली, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला. तर भाजपवाले असे चार नाचे यांच्या पायत घुंगरु बाधून नाचवत आहेत. त्याने आम्हाला काही होणार नाही, असा तिखट शब्दात संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई : संजय राऊत आणि किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातल्या वादाचा मुद्दा आता बदलला आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊतांना किरीट सोमय्या यांनी टार्गेट केले आहे. संजय राऊतांची वाईन व्यावसायत भागिदारी आहे, आसा आरोप सोमय्या यांच्याकडून सुरूवातीला करण्यात आला. त्याला संजय राऊतही जोरदार प्रत्युत्तर देताना दिसून आले. संजय राऊतांना वाईन व्यावसायात भागिदारी कशी मिळाली, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला. तर भाजपवाले असे चार नाचे यांच्या पायत घुंगरु बाधून नाचवत आहेत. त्याने आम्हाला काही होणार नाही, असा तिखट शब्दात संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. आणि हा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काही नेत्यांची मुलं ड्रग्ज घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करतात, असे म्हणत संजय राऊतांनी आणखी एक सूचक विधान केलंय. त्यामुळे या वादात नवा खडा पडला आहे. त्यामुळे हा मुळ मुद्दा वेगळ्या दिशेने निघाला आहे का? असाही सवाल उपस्थित होत आहे.
