देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र…एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?

देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र…एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jun 27, 2026 | 4:37 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यांवर आणि जाहीर सभांवर जोरदार टीका केली आहे. रायगड दौऱ्यात बोलताना त्यांनी, “जाहीर सभा घ्यायला त्यांना मीच लावलं. मी सर्वांना कामाला लावलं आहे,” असा टोला लगावला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यांवर आणि जाहीर सभांवर जोरदार टीका केली आहे. रायगड दौऱ्यात बोलताना त्यांनी, “जाहीर सभा घ्यायला त्यांना मीच लावलं. मी सर्वांना कामाला लावलं आहे,” असा टोला लगावला. तसेच “सगळे गेल्यावर वरातीमागून घोडे” अशी टीकाही त्यांनी केली. आता सभा घेतल्या तरी त्याचा कोणताही फायदा होणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विमान प्रवासाच्या चर्चेवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी “विमानापेक्षा इमान महत्त्वाचं असतं,” असे वक्तव्य केले. 2019 मध्ये जनतेच्या विश्वासाशी बेमानी झाली, असा आरोपही त्यांनी केला. जनतेने एका प्रवासाचे तिकीट दिले होते, मात्र वेगळी वाट निवडण्यात आली, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत, “देवेंद्रजी हुशार आहेत. कपटी मित्र किती घातक असतो, याचा त्यांना अनुभव आहे,” असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

Published on: Jun 27, 2026 4:37 PM
Follow Us