मोठी बातमी! एकनाथ शिंदे पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, राजकीय हालचाली वाढल्या
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा हे काही दिवसांपूर्वी पुण्याच्या दौऱ्यावर होते. पुण्यापाठोपाठ आता अमित शहा मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई दोन महत्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत.
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा हे काही दिवसांपूर्वी पुण्याच्या दौऱ्यावर होते. पुण्यापाठोपाठ आता अमित शहा मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई दोन महत्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. अमित शहा हे मुंबई विभागीय भाजप आणि प्रदेश भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेत राजकीय आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. आता एकानाथ शिंदे पुन्हा अमित शाह यांच्या भेटीला दाखल झाले आहेत.
अमित शाह दोन दिवस मुंबईत असणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, कोर्टात शिवसेना कोणाची याबाबत सुनावणी सुरू आहे. याआधी शिवसेना शिंदे गाटाला नाव आणि पक्षाचं निवडणुक चिन्हा देण्यात आलं होतं मात्र याला ठाकरे गटाने आता आव्हान दिलं आहे. अशात आता एकनाथ शिंदे यांचं थेट अमित शाहांच्या भेटीसाठी दाखलं होणं याला विशेष महत्त्व आलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता विमानाने मुंबईत पोहोचले. मुंबई अमित शहा यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्वागत केलं. शहा यांचे मुंबईच्या विमानतळावर आगमन झालं, त्यावेळी स्वागताला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते.
