Nilesh Rane : …असं करणं चुकीचं, निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणात निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट

Nilesh Rane : …असं करणं चुकीचं, निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणात निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट

| Updated on: Dec 01, 2025 | 6:00 PM

निवडणूक आयोगाने निलेश राणे यांच्या प्रकरणी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही खासगी घरात घुसून कारवाईची मागणी करणे किंवा फेसबुक लाईव्ह करणे आयोगाच्या नियमात बसत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी पैशांचे वाटप होत असल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाने निलेश राणे प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुणाच्याही घरात जाऊन तपास करणे किंवा कारवाईची मागणी करत फेसबुक लाईव्ह करणे हे आयोगाच्या नियमात बसत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. सिंधुदुर्गातील नगरपरिषदेच्या निवडणुकांदरम्यान, निलेश राणे यांनी एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैसे पकडल्याचा आरोप केला होता. या संदर्भात आयोगाकडून माहिती मागवण्यात आली होती. आयोगाने स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल, परंतु खासगी घरात जाऊन अशी कारवाई करणे हे आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Published on: Dec 01, 2025 06:00 PM