जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैशच्या टॉप कमांडरचाही सहभाग; असा केला खात्मा,  बघा ड्रोन दृश्य

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैशच्या टॉप कमांडरचाही सहभाग; असा केला खात्मा, बघा ड्रोन दृश्य

| Updated on: May 15, 2025 | 3:45 PM

जम्मू-काश्मीरमधील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारले आहे आणि परिसराला वेढा घातला आहे. शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामाच्या त्रालमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील त्रालमध्ये सकाळपासूनच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. यावेळी सुरक्षा दलाकडून जैशच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. यामध्ये असीफ अहमद शेख, आमीर नझीर वाणी, यावर अहमद भट्ट याचा सहभाग आहे. 3 दहशतवाद्यांचा खात्मा करतानाची ड्रोन दृश्य आता समोर आली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या कठोर कारवाई करत असीफ अहमद शेख या दहशतवाद्याचं घर देखील पाडण्यात आलं होतं. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या शोपियान भागात ऑपरेशन किलर हे राबवून लष्कर ए तौयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता आणि आज पुन्हा एकदा भारतीय सुरक्षा दलाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Published on: May 15, 2025 03:45 PM