Ashok Kharat Case Update | अशोक खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याला आर्थिक फसवणूक प्रकरणात सिन्नर न्यायालयाने 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करत तपास यंत्रणांना चौकशीसाठी वेळ दिला आहे. अशोक खरातवर आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक केल्याचे गंभीर आरोप असून, या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, खरातच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून त्याच्या आर्थिक व्यवहारांची, संबंधित कागदपत्रांची आणि इतर व्यक्तींशी असलेल्या संपर्कांची तपासणी केली जात आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिन्नर न्यायालयाच्या या निर्णयानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, अशोक खरातकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.