Mumbai | मुंबईच्या समुद्रकिनारी मोठा गोंधळ! तुपकरांच्या आंदोलनाला तीव्र वळण; थेट…
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 4 वा दिवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा येथे त्यांचे आंदोलन सुरू आहे. तुपकर यांची तब्येत खालावत असल्याने राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया परिसरात तुपकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केले. अनेक कार्यकर्ते अरबी समुद्रात उतरले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत कर्जमाफीची योजना फसवी असल्याचा आरोप केला. काही कार्यकर्ते लातूरसह विविध जिल्ह्यांतून मुंबईत दाखल झाले होते.
दरम्यान वाशिममध्ये संतप्त शेतकऱ्यांनी अकोला–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून आंदोलन केले. ‘शेतकऱ्यांना सरसकट व विनाअट कर्जमाफी द्या’ अशी मागणी करत आंदोलकांनी सरकारला इशारा दिला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.