सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
मुंबई: सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील निर्बंधामुळे राज्यभरात विरोधाची लाट उसळली असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. भेसळ रोखणे आवश्यक असले तरी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला (FDA) नवीन एसओपी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात आणि आठवडी बाजारांमध्ये या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम झाला […]
मुंबई: सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील निर्बंधामुळे राज्यभरात विरोधाची लाट उसळली असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. भेसळ रोखणे आवश्यक असले तरी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला (FDA) नवीन एसओपी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ग्रामीण भागात आणि आठवडी बाजारांमध्ये या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. रोजंदारीवर काम करणारे अनेक नागरिक दररोज 20 ते 30 रुपयांचे सुटे तेल खरेदी करतात. पॅकबंद तेल खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने सरकारने पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, कोल्हापूर, नाशिकसह अनेक शहरांतील व्यापाऱ्यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. सुटे तेल म्हणजे भेसळयुक्त तेल असा समज चुकीचा आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर फडणवीस यांनी गुणवत्ता कायम ठेवत पारंपरिक व्यवसायही टिकवण्यासाठी मधला मार्ग शोधला जाईल आणि भेसळ रोखणारी स्पष्ट कार्यपद्धती (SOP) तयार केली जाईल, असे स्पष्ट केले.
