काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

| Updated on: Jul 31, 2022 | 10:37 PM

आजच शिवेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यामुळे अस्लम शेख यांच्या भेटीमुळे चर्चेला ऊत आला आहे. 

मुंबई : काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख(Former Congress Minister Aslam Shaikh) यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे भाजप नेते मोहित कंबोज देखील त्यांच्यासह उपस्थित होते. मोहित कंबोज(Mohit kamboj) आणि अस्लम शेख हे दोघेही एकत्रच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहचले होते.  फडणवीस यांची भेट घेतल्यावर दोघेही एकत्र बाहेर पडले.  अस्लम शेख  यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली? मोहित कंबोज त्यांच्या सोबत का होते याबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही. मात्र,  या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान आजच शिवेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यामुळे अस्लम शेख यांच्या भेटीमुळे चर्चेला ऊत आला आहे.

Published on: Jul 31, 2022 10:37 PM