Kishori Pednekar यांची मुंबई हायकोर्टात जामिनासाठी धाव, काय आहे प्रकरण?

Kishori Pednekar यांची मुंबई हायकोर्टात जामिनासाठी धाव, काय आहे प्रकरण?

Harshada Shinkar | Updated on: Sep 04, 2023 | 10:01 AM

VIDEO | कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांची मुंबई हायकोर्टात जामिनासाठी धाव, मात्र मुंबई पोलिसांचा विरोध

मुंबई, ४ सप्टेंबर २०२३ | कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. किशोरी पेडणेकर यांना कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी जामिन मिळावा यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र मुंबई पोलिसांचा किशोरी पेडणेकर यांच्या या जामिनास विरोध असल्याचे सांगितले जात आहे. कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोरोना संसर्गाच्यावेळी कोव्हिड उपचारांच्या औषधांची खरेदी करण्यात आली होती. पण ही खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती. बॉडी बॅगज खरेदीतही घोटाळा झाला होता. बॉडी बॅग खरेदीबाबत यापूर्वी ईडीच्या सूत्रांनी माहिती दिली होती. त्यानुसार 2 हजार रुपये किंमतीची बॉडी बॅग 6 हजार 800 रुपयांना विकत घेण्यात आली होती. हे कंत्राट देताना महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. या प्रकरणी हा गुन्हा आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

Published on: Sep 04, 2023 9:58 AM
Follow Us