‘… मी लढत राहीन’, गुन्हा दाखल झाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांची पहिली प्रतिक्रिया अन् दिलं हे प्रतिआव्हान

‘… मी लढत राहीन’, गुन्हा दाखल झाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांची पहिली प्रतिक्रिया अन् दिलं हे प्रतिआव्हान

Harshada Shinkar | Updated on: Aug 05, 2023 | 4:49 PM

VIDEO | कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय दिलं प्रतिआव्हान

मुंबई, ५ ऑगस्ट २०२३ | मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी आपली पहिली प्रतिक्रीया माध्यमांना दिली. यावेळी त्या म्हणाल्या, ‘गुन्हा दाखल झाल्याची माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही. कोणत्या आधारावर गुन्हा दाखल झाला याची माहिती मला नाही.’, असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली तर त्या पुढे असेही म्हणाल्या, ‘माहिती मिळाल्यावर अधिकृत भूमिका स्पष्ट करेन. मी मराठी आहे. मी लढत राहीन’, असे म्हणत त्यांनी प्रतिआव्हान सुद्धा दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

व्हिड घोटाळ्याप्रकरणी आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्यावेळी कोव्हिड उपचारांच्या औषधांची खरेदी करण्यात आली होती. पण ही खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती. बॉडी बॅगज खरेदीतही घोटाळा झाला होता. बॉडी बॅग खरेदीबाबत यापूर्वी ईडीच्या सूत्रांनी माहिती दिली होती. त्यानुसार 2 हजार रुपये किंमतीची बॉडी बॅग 6 हजार 800 रुपयांना विकत घेण्यात आली होती.

Published on: Aug 05, 2023 4:49 PM
Follow Us