#Tv9podcast जिथे पोलीस थांबले, तिथून तपास सुरु केला; Rajani Pandit च्या तपासाची थरारक कहानी

#Tv9podcast जिथे पोलीस थांबले, तिथून तपास सुरु केला; Rajani Pandit च्या तपासाची थरारक कहानी

| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 4:08 PM

रजनी यांनी अनेक सीरिअस किलर्स, गुन्हेगारीच्या घटनांचा उलगडा केला आहे. विशेष म्हणजे 30 गंभीर गुन्ह्यांचा उलगडा केल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी 1988 साली त्यांच्या आयुष्यातील पहिल्या केसचा उलगडा केला होता.

आपण जे काम करतो त्या कामात पूर्णपणे झोकून दिलं तर त्या कामातून मिळणारं यश हे अपेक्षेपेक्षाही जास्त असतं. अर्थात यश मिळण्याआधी खूप कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. एखादा प्रसंग असा येतो की सगळं सोडून द्यावं. कधीकधी माणूस नैराश्यात जातो. पण संयमाने न खचता लढत राहिलं तर आपण नक्कीच यशाच्या उंच शिखरावर पोहोचतो. त्यानंतर सर्व जग आपल्या कर्तृत्वाला सलाम करतं. आम्ही आज अशाच एका महिलेची माहिती देणार आहोत ज्या महिलेने अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात टाकून मोठी कामगिरी बजावली आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात महिला म्हणून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. ही व्यक्ती म्हणजे देशाच्या पहिल्या खासगी महिला गुप्तहेर रजनी पंडीत !