मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाचा गोळ्या झाडून खून
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. शहरात पुन्हा एकदा टोळी युद्ध उफाळून आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी नगर बस स्टँड परिसरात अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही हत्या आंदेकर आणि कोमकर टोळीतील वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. भर चौकात आणि भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
वनराज आंदेकर यांची दोन वर्षांपूर्वी नाना पेठ परिसरात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सुरू झालेलं टोळी युद्ध अद्याप थांबलेलं नसल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.