Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास…
गौतमी पाटीलने दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या असून गोविंदा पथकांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तिने मुंबईकरांवरील आपले अपार प्रेम व्यक्त केले, त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण या टप्प्यावर पोहोचलो असल्याचे सांगितले. उत्साहासोबतच स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे तिने अधोरेखित केले. मुंबईकरांच्या प्रेमामुळे ती नेहमीच भारावून जाते.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गौतमी पाटीलने सर्व प्रेक्षक आणि गोविंदा पथकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तीने सांगितलं आहे की मी खूप ऍन्जोय केलं… आता प्रक्षकांना आणखी वगेळं पहायला मिळणार आहे. यावेळी तिने उत्सवाच्या उत्साहासोबतच सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले. दहीहंडी फोडताना प्रत्येक गोविंदाने स्वतःच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन गौतमीने केले. केवळ उत्साहात वाहून न जाता, जबाबदारीने सण साजरा करावा, हा संदेश तिने दिला. मुंबईकरांवरील आपले अपार प्रेम व्यक्त करताना गौतमी पाटील भावूक झाली.
ती म्हणाली, “मी नेहमी मुंबईकरांच्या कार्यक्रमाला येत असते, म्हणजे त्यांचं प्रेम मिळाल्यावर माझं मन नेहमी भरून येतं दरवर्षी. मी मुंबईकरांना एकच सांगेल, तुमच्यामुळं मी आज इथपर्यंत आहे, ह्या स्टेजवर आहे. खरं तर तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम कायम माझ्यासोबत राहू द्या आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा.” तिच्या या शब्दांतून मुंबईकरांप्रती असलेली कृतज्ञता स्पष्टपणे दिसून आली. यावेळी तिच्या डान्सची देखील चर्चा झाली, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. गौतमीने दहीहंडीच्या दिवशी मुंबईत राहून मुंबईकरांचे प्रेम मिळवण्याचा आनंद व्यक्त केला. तिने “आय लव्ह मुंबईकर” असे म्हणत आपले प्रेम पुन्हा एकदा व्यक्त केले.
