Kirit Somaiya | मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले….

| Updated on: May 27, 2026 | 3:04 PM

मुंबईतील घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीत बकरा कुर्बानीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मीरा रोडमधील प्रकरणानंतर घाटकोपरमध्येही बकरा कुर्बानीला विरोध होत असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “कुर्बानीसाठी 22 ते 23 बकरे आणण्यात आले होते. मात्र सागर पार्क सोसायटीमध्ये यापुढे कुर्बानी होऊ दिली जाणार नाही. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या 31 बोकडांपैकी 23 बोकड मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतले आहेत. कुर्बानीसाठी महापालिका पर्यायी जागा उपलब्ध करून देत आहे,” असं सोमय्या यांनी सांगितलं.
तसेच, “कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे. प्रत्येक ठिकाणी सोमय्या जाणार का? आम्ही येथे कुर्बानी होऊ देणार नाही. दोन दिवसांपूर्वी हिंदू रस्त्यावर उतरले म्हणून हे घाबरले आहेत,” असं वक्तव्य करत सोमय्या यांनी प्रशासनावरही निशाणा साधला.
या संपूर्ण प्रकरणामुळे घाटकोपर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Published on: May 27, 2026 2:05 PM
Follow Us