Gold Silver Rate | मोदी सरकारचा मोठा दणका! सोन्यावर आयात शुल्क थेट 15% ; भाव गगनाला भिडले, तर एक तोळं सोनं….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर केंद्र सरकारने सोन्याबाबत मोठा आर्थिक निर्णय घेतला आहे. सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात मोठी वाढ करत ते 6 टक्क्यांवरून थेट 15 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. या निर्णयानंतर देशातील सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली असून, सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

केंद्र सरकारकडून बुधवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली. मौल्यवान धातूंची आयात कमी करणे, परकीय चलन साठ्यावरचा ताण कमी करणे आणि आर्थिक संतुलन राखणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहकांवर होत असून, सोनं आणि चांदी अधिक महाग झाली आहेत.
एमसीएक्सवरील आकडेवारीनुसार, 13 मे रोजी सोन्याच्या दरात तब्बल 9 हजार रुपयांची वाढ झाली असून, प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,62,648 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरात 16 हजार रुपयांची वाढ होऊन प्रति किलो चांदीचा भाव 2,65,805 रुपयांवर गेला आहे. जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे पुढील काळात भारतीय बाजारात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अनावश्यक सोन्याची खरेदी टाळावी, असे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत असून, भविष्यात सोन्याच्या खरेदीवर आणखी काही निर्बंध लागू होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.