Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो मोठी अपडेट, ‘या’ दिवशी जुलैचा हफ्ता खात्यात होणार जमा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो मोठी अपडेट, ‘या’ दिवशी जुलैचा हफ्ता खात्यात होणार जमा

| Updated on: Aug 07, 2025 | 5:44 PM

 जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्र पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र याबद्दल अधिकृत माहिती नसून जुलैचा हफ्ता कधी येणार याची माहिती समोर आली आहे.

जुलै महिना संपत आला तर अद्याप राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा हफ्ता जमा झाला नसल्याचे लाभार्थी महिला वर्गात नाराजी पसरली आहे. तर दोन दिवसांवर रक्षाबंधन सण असल्याने लाडक्या बहिणींना जुलैचा हफ्ता येणार की नाही? अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आहे. अशातच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार असल्याचे दोन दिवसांपूर्वीच सरकारकडून सांगण्यात आले होते. यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधन अर्थात ९ जुलैच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हफ्ता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी मोठी अपडेट महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील पात्र आणि लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याच्या वितरणाला कालपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होताना दिसणार असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ते कोल्हापूर येथे बोलत होत्या.

 

Published on: Aug 07, 2025 05:44 PM