Gopichand Padalkar | आंदोलन हिंसक व्हावं, उद्रेक व्हावा, ही सरकारची भूमिका : गोपीचंद पडळकर

| Updated on: Nov 14, 2021 | 7:43 PM

कोर्टाच्या कमिटीतले सदस्य विलीनीकरणविरोधी आहेत. सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा रविवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केला.

Gopichand Padalkar | आंदोलन हिंसक व्हावं, उद्रेक व्हावा, ही सरकारची भूमिका : गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर
Follow us on

एसटी संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. सरकारकडून खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत. कोर्टाच्या कमिटीतले सदस्य विलीनीकरणविरोधी आहेत. सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा रविवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केला.

एसटीचे विलीनीकरण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून सुरू झालेला संप अजूनही सुरूच आहे. यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, परिवहन मंत्री आणि प्रशासन यांच्या सोबत दोन वेळा चर्चा झाली. मात्र, एसटीच्या विलीनीकरता अजून तरी तोडगा निघालेला नाही. सरकारने कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये, ही हात जोडून विनंती आहे. लवकरात लवकर या संपावर तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. आज मंत्रालयावर सुद्धा अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अनेक कर्मचारी हे त्रस्त झाले आहेत. ते टोकाचं पाऊल उचलत आहेत. माझे सरकारला आवाहन आहे की या संपाचा मधला काहीतरी तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.