GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
गेमिंग चाहत्यांची 13 वर्षांची प्रतीक्षा संपली. GTA 6 जगभरात लॉन्च होताच इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. 10 हजार कोटींहून अधिक खर्च करून तयार झालेल्या या गेमने काही तासांतच दुप्पट कमाई केली. अमेरिका, कॅनडा, जपानसह भारतातील कंपन्यांनी कर्मचाऱ्याना सुट्टी दिली. पंतप्रधान मोदींनीही या गेमचा संदर्भ दिला.
गेमिंग विश्वातील बहुप्रतिक्षित ग्रँड थेफ्ट ऑटो 6 (GTA 6) अखेर मध्यरात्री जगभरात लॉन्च झाला. तब्बल 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा गेम लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्येच त्याला जगभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या गेमने इंटरनेटवर मोठा धुमाकूळ घातला असून, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्याना गेम खेळण्यासाठी विशेष सुट्टीही दिली आहे.
Rockstar Games कंपनीने या गेमच्या निर्मितीसाठी 10 हजार कोटींहून अधिकचा खर्च केल्याची माहिती जागतिक माध्यमांनी दिली आहे. मात्र, विक्रीसाठी उपलब्ध होताच कंपनीने या गेमच्या विक्रीतून दुप्पट कमाई केली आहे. GTA ही मालिका 1997 मध्ये सुरू झाली आणि प्रेम, पैसा, गुन्हेगारी, ड्रग्ज, टोळीयुद्ध व पोलिसांचा पाठलाग याभोवती तिची कथा फिरते.
GTA 6 च्या निर्मितीमध्ये जगभरातील हजारो गेम डेव्हलपर्सनी, ज्यात भारतीय डेव्हलपर्सचाही समावेश आहे, महत्त्वाचा वाटा उचलला आहे. हा गेम PlayStation आणि Xbox या गेमिंग कन्सोलवर सध्या उपलब्ध असून, भारतात याची किंमत 7 ते 8 हजार रुपये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही GTA 5 आणि GTA 6 दरम्यानच्या 13 वर्षांच्या काळाची तुलना भारताच्या विकासाशी करत काँग्रेसवर टोला लगावला आहे.
