Hanuman Jayanti 2026 | राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, नाशिकमधील अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी

Hanuman Jayanti 2026 | राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, नाशिकमधील अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी

| Updated on: Apr 05, 2026 | 2:36 PM

राज्यभरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तसेच नाशिक येथील अंजनेरी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

राज्यभरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तसेच नाशिक येथील अंजनेरी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. अंजनी पुत्र हनुमान हे प्रभू रामाचे परम भक्त म्हणून पूजीले जातात. हनुमान हे फक्त भगवान रामांचे परमभक्त म्हणूनच नाही तर अपार शक्तीचे धनी आणि संकटमोचन म्हणून ओळखले जातात.

हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी मंदिरावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मंदिरात लहानसा पाळणा तयार करण्यात आला असून बाल हनुमंताचा जन्मोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. मंदिरात आलेल्या भाविकांना केळी, बुंदी, पंजिरीचा प्रसाद दिला जात आहे. या प्रसादाला आज विशेष महत्त्व आहे. नाशिकसह राज्यातील इतर भागांमध्येही भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. लहानांपासून तर ज्येष्ठ मंडळी परिसराजवळच्या मंदिरातील भजन कीर्तन, रामलीला अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेत आहेत. एकूणच राज्यभरातील वातावरण भक्तीमय झालं आहे.

Published on: Apr 02, 2026 12:01 PM
Follow Us