तुळजाभवानी आईचा गाभारा सजला, द्राक्षांची नयनरम्य आरास

तुळजाभवानी आईचा गाभारा सजला, द्राक्षांची नयनरम्य आरास

| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 12:48 PM

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज रंगपंचमी निमित्त द्राक्षांची आरास करण्यात आली. तुळजापूर येथील देवी भक्त संतोष बोबडे यांनी देवी चरणी ही द्राक्षांची आरास अर्पण केली होती.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज रंगपंचमी निमित्त द्राक्षांची आरास करण्यात आली. तुळजापूर येथील देवी भक्त संतोष बोबडे यांनी देवी चरणी ही द्राक्षांची आरास अर्पण केली होती. देवीचरणी नवस पूर्ती म्हणून शेतातील पिक अर्पण करण्याची प्रथा तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरु झाली असून त्याला भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. संतोष बोबडे यांच्या शेतात पिकलेल्या द्राक्षांची भेट देवीला दिली आहे. दरवेळी मोसंबी, द्राक्ष, आंबे, केळी यासह विविध फळे अर्पण केली जातात तर आकर्षक फुलांची सजावट केली जाते. या फळांमध्ये सजलेले देवीचे रुप खूप सुंदर वाटत होते.