Sanjay Raut | मराठवाड्यात ठिणगी पडली की वणवा पेटायला वेळ लागत नाही – संजय राऊत
महागाईविरोधात आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात शहरात भव्य मोर्चा निघाला आहे. प्रत्येक जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढीविरोधात सामान्य जनतेचा हा आक्रोश असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी मोर्चाप्रसंगीच्या भाषणात केले.
महागाईविरोधात आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात शहरात भव्य मोर्चा निघाला आहे. प्रत्येक जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढीविरोधात सामान्य जनतेचा हा आक्रोश असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी मोर्चाप्रसंगीच्या भाषणात केले. शहरात आज शिवसेनेने क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला. गुलमंडीवर पोहोचल्यावर संजय राऊत यांनी या आंदोलनामागील शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
भाषणात बोलताना संजय राऊत म्हणाले, महागाईविरोधात शिवसेनेच्या या आक्रोशाची ठिणगी संभाजीनगरात पडली आहे. या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली आहे. मराठवाड्यानं महाराष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली आहे. हा इतिहास पाहता आम्ही मराठवाड्याची राजधानी संभाजीनगरातून आम्ही या आक्रोश मोर्चाला सुरुवात केली आहे. ही तर सुरुवात असून या ठिणगीचा वणवा थेट दिल्लीपर्यंत पोहोचेल. या आक्रोशामुळे दिल्लीतील केंद्र सरकारचे तख्तही यामुळे हादरेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
