भाजपशासित राज्यात अ‍ॅन्टी इन्क्मबन्सी नाही तर प्रो इन्क्मबन्सी – मोदी

| Updated on: Feb 09, 2022 | 11:13 PM

युपीमध्ये उद्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. यावेळी बोलताना उत्तरप्रदेशमध्ये भाजापचा विजय निश्चत असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

Follow us on

नवी दिल्ली : युपीमध्ये (up) उद्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान (elections) होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांनी आज संवाद साधला. यावेळी बोलताना उत्तरप्रदेशमध्ये भाजापचा विजय निश्चत असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना मोदींनी म्हटले आहे की, निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी कुठल्याही राज्याचा दौरा करु शकलो नाही. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने काही मर्यादा आखून दिल्या होत्या. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी काही ठिकाणी जनतेला संबोधित केलं. आम्ही नेहमी जनतेच्या सेवेत असतो. सरकारमध्ये असतो तेव्हा अधिक तीव्रतेनं, अधिक विस्ताराने, सबका साथ , सबका विकास हा मूलमंत्र घेऊन काम करतो. आम्ही जनतेच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देतो. सर्वांना सोबत घेऊन देशाचा विकास साध्य करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. भाजपशासित राज्यात अ‍ॅन्टी इन्क्मबन्सी नाही तर प्रो इन्क्मबन्सी दिसून येते.