Election : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, शिंदे गटाचा बोलबाला, शिवसेना चौथ्या, तर काँग्रेस पाचव्या क्रमांकावर

| Updated on: Aug 05, 2022 | 7:49 PM

27 ग्रामपंचायतींसह शिवसेना (Shiv Sena) चौथ्या क्रमांकावर आहे. 22 ग्रामपंचायतींसह काँग्रेस मात्र पाचव्या क्रमांकावर आहे. एकंदरित राज्यात सत्ता असलेल्या पक्षांना ग्रामपंचायतीमध्ये मतदारांना पसंती दिली. 

Follow us on

मुंबई : राज्यात शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत (Gram Panchayat Election) भाजप-शिंदे गटानं बाजी मारली. भाजप आणि शिंदे गटाकडं महाविकास आघाडीपेक्षा जास्त ग्रामपंचायती आल्या आहेत. 271 पैकी 122 ग्रामपंचायती भाजप आणि शिंदे गटाकडं आल्या आहेत. 271 पैकी 102 ग्रामपंचायती या महाविकास आघाडीकडं गेल्या आहेत. 15 जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटानं बाजी मारली. 271 पैकी 82 ग्रामपंचायतींसह भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. 53 ग्रामपंचायतींसह राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर, तर 40 ग्रामपंचायतींसह शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर आहे. 27 ग्रामपंचायतींसह शिवसेना (Shiv Sena) चौथ्या क्रमांकावर आहे. 22 ग्रामपंचायतींसह काँग्रेस मात्र पाचव्या क्रमांकावर आहे. एकंदरित राज्यात सत्ता असलेल्या पक्षांना ग्रामपंचायतीमध्ये मतदारांना पसंती दिली.