विकासाच्या नावाने शेकडो वर्षाची झाडे क्षणात तोडताय, सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली खंत

| Updated on: Mar 16, 2023 | 2:56 PM

VIDEO | वृक्षतोडीच्या कायद्यामध्ये काही बदल नाही, सयाजी शिंदे खंत व्यक्त करत म्हणाले...

Follow us on

कराड : पुणे बेंगलोर आशियायी महामार्ग रुंदीकरणात तोडली जाणारी अनेक वर्षांच्या झाडांचे यशस्वी स्थानांतरण आणि पुर्नरोपन अभिनेता सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई संस्थेतर्फे कराड वहागाव ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये केले जात असून अभिनेते सयाजी शिंदे हे स्वतः दोन दिवसांपासून जागेवर तळ ठोकून या शेकडो वर्षांच्या झाडांचे पुर्नरोपन करत आहेत. वहागावात रुंदीकरणात तोडले जाणार असलेले शेकडो वर्ष जुने आठ ते दहा वटवृक्षांचे पुर्नरोपण केले आहे. गावकऱ्यांनी ही गावात झाडांचे पुर्नरोपन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. विकासाच्या नावाने शेकडो वर्ष ऑक्सिजन देणारी वृक्ष, झाडे क्षणात तोडली जातायत. पशुपक्षी यांची असरे नाहीसे होतायत यासाठी कडक कायदे हवेत. जगात वड, पिंपळ, उंबर हे वृक्ष जगले पाहिजेत. हजारो पक्षी यावर त्यांची घरटी करून राहतात. माणसापेक्षा कडक कायदे झाडांसाठी हवेत. वृक्षतोडीच्या कायद्यामध्ये काही बदल नाही, अशी प्रतिक्रिया देत असताना सयाजी शिंदे यांनी खंत व्यक्त केली आहे.