Special Report | विदर्भात पावसाचा कहर,अनेक गावं पाण्यात

| Updated on: Jul 18, 2022 | 10:09 PM

हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू आणि देवळी या गावांमध्ये काही नागरिक अडकून पडले होते. अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. पुराच्या पाण्याने चारही बाजूने वाढल्याने येथील एका गावात तब्बल 400 जण अडकून पडले होते.

Follow us on

वर्धा: विदर्भात( Vidarbha) पावसाने(rain) अक्षरशः कहर केला आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा जिल्ह्यात 24 तासांमध्ये तब्बल 136 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू आणि देवळी या गावांमध्ये काही नागरिक अडकून पडले होते. अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. पुराच्या पाण्याने चारही बाजूने वाढल्याने येथील एका गावात तब्बल 400 जण अडकून पडले होते. विदर्भात (Vidarbha) पावसाचा जोर अद्याप कायम आहे. ठिकठिकाणी पूर आला. कित्तेकांना विस्थापीत व्हावे लागले. पुरामुळं जागोजागचे रस्ते बंद आहेत. याचा फटका रुग्ण तसेच प्रवाशांना बसला. वर्धा, गडचिरोलीतील पूरपरिस्थिती अतिशय गंभीर आहे.