Kolhapur Rain | कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सांगली-कोल्हापूरला थोडा दिलासा

| Updated on: Jul 22, 2021 | 2:48 PM

कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Follow us on

कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. अलमट्टीतून 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे सांगली-कोल्हापूरला थोडा दिलासा मिळाला आहे. NDRF च्या दोन टीम कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. कोल्हापूर शहरासाठी एक तर शिरोळसाठी एक टीम रवाना झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सकल भागात पुराच पाणी साचलंआहे. दुपारपर्यंत NDRF च्या टीम कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत.रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवस खबरदारीचे आहेत. तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही रोखण्यात आली आहे.