Pak ministry twitter hacked : पाकनं 2 दिवसातच भारतासमोर टेकले गुडघे अन् जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?

Pak ministry twitter hacked : पाकनं 2 दिवसातच भारतासमोर टेकले गुडघे अन् जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?

| Updated on: May 09, 2025 | 12:21 PM

भारतीय सैन्याच्या आधुनिक शस्त्रास्त्रे आणि संरक्षण प्रणालींनी ड्रोन, क्षेपणास्त्रे, हवाई संरक्षण प्रणाली, AWACS यासह पाकिस्तानची अनेक शस्त्रे नष्ट केली. तेव्हापासून पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत आहे. आता त्याला जगासमोर भीक मागावी लागत आहे. पण पाकने म्हटले की ज्या अकाउंटवरून मदतीसाठी ट्विट केले गेले होते ते अकाऊंट हॅक झाले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. याला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने आधुनिक शस्त्रे आणि संरक्षण प्रणाली वापरून पाकचे ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रांचा चुराडा केल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर पाकिस्तानची परिस्थिती बिकट झाल्याचे चित्र आहे. अशातच पाकिस्तानने जगातील अनेक देशांपुढे हात परसले असून जागतिक बँकेला ट्विट करून आर्थिक मदत मागितली. यावर भारतीय युजर्सकडून पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवली जात असल्याचे ट्विटरवर दिसतंय.

भारताकडून देण्यात येत असलेल्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानची परिस्थिती २ दिवसांतच बिकट झाली आहे. आता पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर पदर पसरू लागला आहे. पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने आज सकाळी एक ट्विट पोस्ट केले. यामध्ये त्याने जागतिक बँकेला टॅग केले आणि रडत अगाऊ कर्जाची भीक मागितल्याचे पाहायला मिळाले. अशातच पाकिस्तानी अर्थमंत्रालयाच्या टि्वटर अकाऊंटवरून कर्ज मागितल्याचे एक ट्विट समोर आले होते. या ट्विटद्वारे वर्ल्ड बँकेकडे कर्ज मागितले होते. मात्र आता पाकिस्तानी अर्थमंत्रालयाचं टि्वटर अकाऊंट हॅक झाल्याचे पाककडून सांगितले जातंय.

Published on: May 09, 2025 12:21 PM