Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात

| Updated on: Oct 06, 2026 | 1:25 PM

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीने आज आकाशवाणी भवनासमोर तीव्र मोर्चा काढला. मतदारांच्या यादीतील गोंधळ आणि मतचोरीच्या आरोपावरून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीने आपला निषेध नोंदवला.

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीने आज संसद भवन ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मतचोरीचा आरोप आणि मतदार यादीतील गोंधळावरून विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला. या मोर्चामध्ये इंडिया आघाडीतील १९ पक्षांचे जवळपास १५० हून अधिक खासदार सहभागी झाले होते.

पोलिसांनी दिल्लीत विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून खासदारांना अडवण्याचा प्रयत्न केला. अखेरीस, आकाशवाणी भवनाजवळ राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आकाशवाणी भवनाच्या गेटवरही काही काळ शाब्दिक चकमक झाली. आंदोलनकर्ते ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत होते. इंडिया आघाडीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Published on: Oct 06, 2026 1:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us