Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल

Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल

| Updated on: Oct 08, 2026 | 3:08 PM

दिल्लीत इंडिया आघाडीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक खासदार आंदोलनात सहभागी झाले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून, "लंच डिप्लोमसी"नंतर आंदोलनाची रणनीती ठरवण्यात आली.

नवी दिल्लीत इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी तीव्र आंदोलन केले. कॅनॉट प्लेस परिसरातील हॉटेलमध्ये आयोजित “लंच डिप्लोमसी”नंतर या आंदोलनाला सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी हे आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले असून, अनेक इंडिया आघाडीचे खासदार यात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाद्वारे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, काँग्रेस कार्यकर्ते आणि एनएसयूआयच्या सदस्यांनी ग्यानू तो गियो अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. जंतर-मंतरच्या दिशेने कूच करण्याच्या इंडिया आघाडीच्या प्रयत्नांना पोलिसांनी विरोध केला. महाराष्ट्रातील काही खासदारही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Published on: Oct 08, 2026 3:08 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us