India Pakistan War : पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस, बघा व्हिडीओ

India Pakistan War : पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस, बघा व्हिडीओ

| Updated on: May 10, 2025 | 2:13 PM

भारताने पाकिस्तानमधील लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. लाहोर आणि रावळपिंडीसह पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी भारताकडून प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्यात येत आहे. रावळपिंडीतल्या नूर खान एअरबेसवर भारताचा जबरदस्त हल्ला, बघा व्हिडीओ

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच तंतरल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानकडून अद्याप भारतावर हल्ल्याचा प्रयत्न सुरूच आहे. तर भारताकडून प्रत्युत्तरादाखल पाकवर हल्ले केले जात आहे. भारतीय हल्ल्यात पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे असणारा नूर खान एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आला आहे. नूर खान एअरबेसच्या विध्वंसाचा नवा व्हिडिओही समोर आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, नूर खान एअरबेसला पूर्वी चकलाला एअरबेस म्हणून ओळखले जायचे. पाकिस्तानसाठी हे एअरबेस धोरणात्मक, लष्करी आणि राजकीय दृष्टिकोनातून खूप महत्वाचे होते. हे एअरबेस राजधानी इस्लामाबादला लागून असलेल्या रावळपिंडी येथे आहे आणि पाकिस्तान हवाई दलाच्या व्हीआयपी हालचाली आणि लष्करी कारवायांचे मुख्य केंद्र मानले जाते.

Published on: May 10, 2025 02:13 PM