Pakistan Drone Attack : पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला? बघताच क्षणी तुम्हालाही….

Pakistan Drone Attack : पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला? बघताच क्षणी तुम्हालाही….

| Updated on: May 09, 2025 | 3:40 PM

भारत पाक यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाही आहे. मात्र भारताकडून पाकिस्तानला वेळोवेळी चोख प्रत्युत्तर मिळत आहे, तरीसुद्धा पाक थांबत नाहीये.

पाकिस्तानने पुंछमध्ये केलेल्या हल्ल्याचे आता थरारक व्हिडिओ समोर आले आहेत. पुंछमधील सामान्य नागरिकांच्या घरावर पाकने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तानचा हा हल्ला भारतीय लष्कराने परतवून लावला आहे. त्याचाच हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. भारतीय लष्कराने पुन्हा पाकचा हल्ला हाणून पाडला. पुंछमधील सामान्य नागरिकांच्या घरावर पाकने हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. भारताने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानवर कारवाई केली होती. यानंतरही पाकच्या कुरापती थांबायचं काही नाव घेत नाही. पाकच्या गोळीबारात पुंछमधील घरांसह दुकानांचं ही मोठं नुकसान झालं आहे. एकीकडे पाकिस्तान कांगावा करतोय आम्ही कुठल्याही प्रकारचा हल्ला करत नाही. मात्र दुसरीकडे पाकच्या या कुरापती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. बघा याच हल्ल्याचा थरारक व्हिडीओ

Published on: May 09, 2025 03:40 PM