T20 World Cup | T20 विश्वचषक सेमीफायनलमध्ये भारत-इंग्लंड आज आमनेसामने; वानखेडेवर रंगणार थरार

T20 World Cup | T20 विश्वचषक सेमीफायनलमध्ये भारत-इंग्लंड आज आमनेसामने; वानखेडेवर रंगणार थरार

| Updated on: Mar 05, 2026 | 12:02 PM

T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज भारत आणि इंग्लंड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सेमीफायनलचा थरार रंगणार असून क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. याआधी T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड हे संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत.

T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज भारत आणि इंग्लंड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सेमीफायनलचा थरार रंगणार असून क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. याआधी T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड हे संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे, तर एकदा इंग्लंडने बाजी मारली होती. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. त्यामुळे फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांकडून जोरदार लढत अपेक्षित आहे.

Published on: Mar 05, 2026 12:02 PM
Follow Us