Operation Sindoor : भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच तुम्हालाही वाटेल अभिमान

Operation Sindoor : भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच तुम्हालाही वाटेल अभिमान

| Updated on: May 10, 2025 | 5:12 PM

Indian Army Destroys Terrorist Launchpads : घाबरलेल्या स्थितीत, पाकिस्तानी सैन्य ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतीय सीमेजवळील शहरांवर हल्ले करत आहे, जे भारतीय सैन्याकडून हाणून पाडले जात आहेत. अशातच भारतीय सैन्याने आज एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय सैनिकांनी दहशतवाद्यांचे लाँचपॅड कसे उद्ध्वस्त केले ते दाखवण्यात आले आहे. तुम्ही एकदा तरी हा व्हिडीओ पाहिलाच हवा..

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तणाव सतत वाढत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जण ठार आणि २० जण जखमी झाले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यानंतर पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचे पाहायला मिळतंय. पाकिस्तान गेल्या दोन दिवसांपासून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय मात्र पाकचा डाव अयशस्वी होतोय. भारत पाकचे प्रत्येक हल्ले सीमेवरच उधळून लावत आहे. अशातच भारतीय लष्कराकडून एक अधिकृत व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. भारतीय सैन्यांच्या शौर्याचा हा व्हिडीओ भारतीय लष्कराकडून जारी करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची छाती देखील अभिमानाने उंचावेल आणि तुम्हाला आपल्या भारतीय सैन्याचा अभिमान वाटेल हे नक्की….

Published on: May 10, 2025 05:12 PM