New Railway Rule : महिलांसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, गर्भवती आहात? वय 45 पेक्षा जास्त? तर हा नवा नियम तुमच्यासाठीच….

New Railway Rule : महिलांसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, गर्भवती आहात? वय 45 पेक्षा जास्त? तर हा नवा नियम तुमच्यासाठीच….

| Updated on: Nov 03, 2025 | 2:10 PM

भारतीय रेल्वेने 45 वर्षांवरील महिला आणि गर्भवती प्रवाशांसाठी महत्त्वाचा नियम बदलला आहे. आता त्यांना तिकीट बुक करताना आपोआपच लोअर बर्थची सुविधा मिळेल. ही विशेष तरतूद महिला प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे, ज्यामुळे 45 वर्षांवरील महिला आणि गर्भवतींना आता रेल्वे प्रवासात लोअर बर्थची सोय मिळणार आहे. प्रवाशांना तिकीट बुक करताना आपोआपच खालची बर्थ (लोअर बर्थ) उपलब्ध करून दिली जाईल अशी विशेष तरतूद रेल्वे प्रशासनाने केली आहे. रेल्वेच्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या या बदलामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेषतः ज्येष्ठ महिला आणि गर्भवतींना प्रवासात अधिक आराम मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लोअर बर्थ मिळवण्यासाठी यापुढे विशेष विनंती करण्याची गरज भासणार नाही, कारण ही सुविधा आता तिकीट बुकिंग प्रक्रियेतच समाविष्ट करण्यात आली आहे. या नवीन सुविधेमुळे महिला आणि गर्भवती प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल अशी अपेक्षा आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Published on: Nov 03, 2025 02:10 PM