मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडेवारी समोर…

मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडेवारी समोर…

| Updated on: May 18, 2026 | 1:19 PM

भारतीय रुपयाची घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी कमजोर झाला असून तो 96.33 या ऐतिहासिक नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. सलग पाचव्या सत्रात रुपयाने नवा तळ गाठल्याने आर्थिक क्षेत्रात चिंता वाढली आहे.

पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि अमेरिकन बाँड यिल्डमधील वाढ यामुळे रुपयावर दबाव निर्माण झाला आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्चे तेल आयात करणारा देश आहे. देशातील जवळपास 88 टक्के तेल आयातीवर अवलंबून असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलदर वाढले की त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि रुपयावर दिसून येतो.

इराण युद्धानंतर रुपया सुमारे 5.5 टक्क्यांनी घसरला असून आशियातील सर्वात कमजोर चलनांपैकी एक ठरला आहे. चालू वर्षात रुपयात तब्बल 7 टक्क्यांची घसरण झाली आहे. नुकतीच भारताने तेल पुरणाऱ्या देशांसोबत डील केल्याचंही समोर येत असून कोट्यावधी रुपयांचं कच्च तेल देशात आणलं जाणार आहे.

Published on: May 18, 2026 01:19 PM
Follow Us