मोठी बातमी! राज ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून शाईफेकीसह सुपारीफेक

मोठी बातमी! राज ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून शाईफेकीसह सुपारीफेक

| Updated on: May 09, 2026 | 5:04 PM

जालना शहरात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर शाईफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे कार्यकर्त्यांकडून ही शाईफेक करण्यात आली असून, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ही घटना जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात घडली. गुणरत्न सदावर्ते यांचे वाहन परिसरात येताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर शाईफेक केली.

जालना शहरात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर शाईफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे कार्यकर्त्यांकडून ही शाईफेक करण्यात आली असून, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ही घटना जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात घडली. गुणरत्न सदावर्ते यांचे वाहन परिसरात येताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर शाईफेक केली. यावेळी वाहनावर सुपाऱ्याही फेकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते हे मनसे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करत होते. त्यांच्या या वक्तव्यांविरोधात मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यातूनच ही घटना घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे जालना शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Published on: May 09, 2026 05:02 PM
Follow Us