Alandi | Vikas Lawande | आळंदीमध्ये वारकरी वाद चिघळला! शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक
वारकरी संप्रदायातील घुसखोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आळंदीत मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज सकाळी शाईफेक करण्यात आली. हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी येथे सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, हभप संग्राम भंडारे यांनी आपल्या समर्थकांसह विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकली. वारकरी संप्रदायातील साधुसंत आणि गुरुवर्यांविरोधात लवांडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संताप व्यक्त करत ही कृती केल्याचा दावा भंडारे यांनी केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायात “मनुवादी आणि कट्टर हिंदुत्ववादी घुसखोर शिरले आहेत” असा आरोप विकास लवांडे यांनी केला होता. त्यांनी काही कीर्तनकारांवरही गंभीर आरोप केले होते. या वक्तव्यावरून वारकरी संप्रदाय आणि विविध धार्मिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
घटनेदरम्यान संग्राम भंडारे हे “आमच्यावर काहीही बोला, पण आमच्या गुरुवर्यांवर टीका करू नका,” असे म्हणत लवांडे यांच्यावर संताप व्यक्त करत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे, विकास लवांडे यांनी या घटनेनंतर “मला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला,” असा गंभीर आरोप केला आहे.
या घटनेमुळे आळंदी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.