Marathi News Videos Is uddhav thackeray has doubt on his father balasaheb thackeray shocking statement of Ramdas kadam in dapoli watch video

Ramdas Kadam : सारखा बोलतो, मी बाळासाहेबांचा मुलगा, संशय आहे का? रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल
बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा उद्धव ठाकरेंना संशय आहे की काय? असं म्हणत कदमांनी जहरी टीका केलीय. सोनिया गांधींच्या नादाला लागून उद्धव ठाकरे बिघडले असंही रामदास कदम म्हणालेत.
रत्नागिरी : शिंदे गटातले (Ekanth Shinde Gorup) नेते आणि शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे परिवारावर जहरी टीका केलीय. उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत असं बोलताना रामदास कदमांनी (Ramdas Kadam) उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केलाय. उद्धव ठाकरे हे आपण बाळासाहेबांचा मुलगा आहे असं वारंवार सांगतात. त्यामुळं बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) संशय आहे की काय? असं म्हणत कदमांनी जहरी टीका केली. सोनिया गांधींच्या नादाला लागून उद्धव ठाकरे बिघडले असंही रामदास कदम म्हणालेत. शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी दापोलीत मेळावा घेतला होता. या मेळाव्यात रामदास कदम बोलत होते.
Published on: Sep 19, 2022 8:15 AM
Related Video
तर ओमराजेंना तिकीटच दिले नसते, उद्धव ठाकरेंची तोफ धाराशीवमध्ये कडाडली!
वैभवला संधी नाही, मग घेतलंच कशाला? चाहत्यांचा संतप्त सवाल
'ओमराजे का पळून गेले...', संजय राऊत यांनी भरसभेत सांगितले मोठे कारण
टीम इंडियाची निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटिंग
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,