Kabutar khana : शस्त्र उचलणार अन् कोर्टाला न मानण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींचा यु-टर्न, आता बघा काय म्हणताय…

Kabutar khana : शस्त्र उचलणार अन् कोर्टाला न मानण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींचा यु-टर्न, आता बघा काय म्हणताय…

| Updated on: Aug 13, 2025 | 12:10 PM

कबुतरखानावरून जैन मुनींनी थेट कोर्टालाच आव्हान दिले होते, आमच्या धर्माविरोधात निकाल आला तर कोर्टालाही आम्ही मानणार नाही वेळ पडली तर हाती शस्त्रही घेऊ अशी विधानं केली होती मात्र आता त्यांची भाषा बदलल्याचे दिसतंय.

मुंबईच्या दादरयेथील दादर कबुतरखाना परिसरात कबुतरांना दाणे आणि धान्य टाकण्यावर हायकोर्टाने बंदी घातली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे निर्माण झालेल्या वादात जैन मुनींनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले होते. जैन मुनींनी कोर्टाच्या निर्णयाचा निषेध करून थेट शस्त्र उचलण्याची भाषा केली आहे. त्यांच्या मते, हा निर्णय त्यांच्या धर्माविरुद्ध आहे. कोर्टाने नागरिकांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले असून, या निर्णयाचे उल्लंघन करू नये असा इशारा दिला आहे. दरम्यान, जैन मुनी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला असून, त्यांच्या समर्थनाचा दावा केला आहे. जैन समाजातील मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना आम्ही कोर्टाला मानणार नाही असं म्हणणाऱ्या आणि शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या याच जैन मुनींनी आता यु-टर्न घेतल्याचे पाहायला मिळालंय. बघा आता कशी भाषा बदलली?

Published on: Aug 13, 2025 12:10 PM