जळगावात बायपासवर भीषण अपघात! 4-5 वाहनांची एकमेकांना धडक अन्…

| Updated on: Feb 28, 2026 | 12:08 PM

जळगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गाला जोडणाऱ्या पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात झाला. एका कंटेनरने विरुद्ध दिशेने येत चार ते पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, एक कंटेनर चालक जखमी झाला आहे, तर किरकोळ जखमींना रुग्णालयात हलवले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या पाळधी-तरसोद बायपासवर एका भीषण अपघाताची नोंद झाली आहे. या ठिकाणी किमान चार ते पाच वाहने एकमेकांना धडकली, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला एक कंटेनर उलटल्याने वाहतूक एका मार्गावर वळवण्यात आली होती.

या वाहतूक वळवलेल्या मार्गावर एका कंटेनरने विरुद्ध दिशेने येत सर्वप्रथम एका चारचाकीला धडक दिली. त्यानंतर सलग एक ते दोन अन्य वाहनांना धडक देत तो थांबला. या अपघातात एक कार पूर्णपणे कंटेनरमध्ये शिरल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, क्रेटा गाडीला धडकल्यानंतर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातात चार वाहनांना धडक बसल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कंटेनर चालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही किरकोळ जखमींना देखील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातामुळे बायपासवरील एका बाजूची वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.

Published on: Feb 28, 2026 12:08 PM
Follow Us