जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन

जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन

| Updated on: Aug 18, 2026 | 2:52 PM

काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आज जालन्यात भीमशक्ती संघटनेने भारतीय जनता पक्षाविरोधात जोरदार मुंडन आंदोलन केले. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर काही जणांनी सभेस्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. मल्लिकार्जुन खरगे […]

काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आज जालन्यात भीमशक्ती संघटनेने भारतीय जनता पक्षाविरोधात जोरदार मुंडन आंदोलन केले. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर काही जणांनी सभेस्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. मल्लिकार्जुन खरगे हे दलित समाजाचे ज्येष्ठ नेते असताना, त्यांच्या सभेस्थळी अशा प्रकारे गोमूत्र शिंपडणे म्हणजे जातीय भेदभाव असून, भारतीय राज्यघटनेचा अपमान असल्याचे आंदोलकांनी म्हटले. भारत स्वतंत्र होऊन ८० वर्षे झाली असली तरी, काही घटकांमध्ये जातीयता अजूनही कायम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपच्या निषेधार्थ मुंडन केले. चंद्रकांत हंडोरे जे आदेश देतील, त्यानुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असेही आंदोलकांनी सांगितले. हे आंदोलन केवळ जालन्यातच नव्हे, तर राज्यभरात करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

 

Published on: Aug 18, 2026 2:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us