Jiah Khan suicide case : जिया खानच्या आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष सुटका
3 जून 2013 रोजी जिया खान तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. त्यावेळी तिच्या मृतदेहासोबत सहा पानी सुसाईड नोटही सापडली होती.
मुंबई : अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे सध्या जिया खानच्या कुटूंबाला धक्का बसला आहे. 3 जून 2013 रोजी जिया खान तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. त्यावेळी तिच्या मृतदेहासोबत सहा पानी सुसाईड नोटही सापडली होती. यानंतर जियाची आई राबिया खाननेही सूरज पांचोलीवर याप्रकरणी आरोप केले होते. या आरोपांनंतर सूरज पांचोलीला 10 जून 2013 रोजी अटक करण्यात आली होती. दोन आठवड्यांहून अधिक काळ कोठडीत राहिल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
Published on: Apr 28, 2023 01:22 PM
